जळगाव जिल्हा हादरला : २० वर्षीय दलित तरुणीवर अत्याचार करीत विष देऊन मारले

Jalgaon Gang Rape

जळगाव :- आधी तिघांनी एका दलित तरुणीवर केलेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची विष पाजून केलेली हत्या या अमानूष घटनेने जळगाव जिल्हा हादरून गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील कासोदा येथे ही घटना घडली.

बलात्कारानंतर विष पाजून मारण्यात आलेली ही तरुणी २० वर्षांची होती. तिने स्वत:च मृत्यूपूर्वी तिच्यावरील आपबिती आणि त्या तिघांच्या कुकृत्यांबद्दल आपली आई आणि मामाला सांगितले.

तीन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले. ही तरुणी टोळी येथील राहणारी होती. तिला कासोदा येथे नेऊन अत्याचार करण्यात आला आणि नंतर पारोळा येथे एका शेतमळ्यात फेकले. ती बेशुद्धावस्थेत पडून होती. या बाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टोळी ता. पारोळा येथील २० वर्षीय तरुणी ही पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती. ती दिवाळीच्या सुटीत पारोळा येथे वास्तव्याला असलेल्या तिच्या मामांकडे ३ नोव्हेंबरपासून आली होती. ७ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता मेडिकल स्टोअरमध्ये जाते असे सांगून घरून गेली.  उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. तपास न लागल्याने तिच्या मामांनी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरविल्याची तक्रार ८ नोव्हेंबरला केली. त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता ती पारोळा येथील जुलूमपुरा येथे एका मळ्यात  बेशुद्धावस्थेत आढळून आली. यावेळी या ठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना ही मुलगी दिसली. त्यांनी लगेच मोटारसायकलने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार झालेत. तिने मृत्यूशी झुंज दिली पण १० रोजी पहाटे ४ वाजता तिची प्राणज्योत विझली.

या तरुणीला तिचे नातेवाईक पुढील उपचारांसाठी धुळे येथे नेत असता तिला  शुद्ध आली होती. काय प्रकार झाला, ओळखीचा शिवनंदन पवार याने मला गुंगीचे औषध देऊन त्याच्या सोबत असलेले पप्पू अशोक पाटील , अशोक वालजी पाटील (सर्व, रा. टोळी )  या तिघांनी  पारोळा येथून बळजबरीने एका वाहनातून मला कासोदा येथे नेले व गुंगीचे औषध देऊन रात्रभर माज्यावर आळीपाळीने  बलात्कार केला  तसेच वाच्यता होऊ नये म्हणून मला बळजबरी विष पाजले असे तिने आई,मामा व बहीण  यांना सांगितले. धुळ्याच्या शासकीय रुग्णालायत आज पहाटे तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणि अटक व बदनामीच्या भीतीने त्याने घेतले विष

या घटनेतील एक आरोपी शिवनंदन पवार याने अटक होण्याच्या व बदनामीच्या भीतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो बचावला. त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. धुळे येथील एका रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले आहे आणि रुग्णालयाभोवती पोलिसांचा पहारा आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होईल. दुसरा आरोपी अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलेी. तिसरा आरोपी पप्पू व या तिघांना साथ देणारी एक महिला फरारी आहे. सर्वांना अटक होत नाही तोवर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका तरुणीच्या नातेवाइकांनी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : हल्ल्यात जखमी भाजप नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER