वयाच्या पंधराव्या वर्षी नासाचे कॉम्प्यूटर हॅक करणाऱ्या मुलानं म्हणून केली होती आत्महत्या…

नासाला जगातली सर्वात अधुनिक आणि सुरक्षित अवकाश संशोधन संस्था मानलं जातं.नासाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्यूटर सिस्टमला जगात तोड नाही. जगभरातले एक्सपर्ट या सिस्टमला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी डोळ्या तेल घालून त्याचं काम करतायेत. नासाचं सॉफ्टवेअर हॅक (Software Hack) होऊच शकत नाही, अशी मान्यता होती. पण ही धारणा एका १५ वर्षाच्या मुलानं खोडून काढली होती. यामुळं नासाला कित्येक दिवस आपलं काम बंद ठेवावं लागलं होतं.

या घटनेनं त्या मुलाच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यानं त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आयुष्यात अनेक वाईट घटनांमुळं त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि शेवटी यातचत त्यानं आत्महत्या करुन जीवन यात्रा संपवली होती.

अमेरिकेत जेव्हा कॉम्प्यूटर आणि इंटरनेटचा प्रसार सुरु झाला तेव्हा अनेकांना या तंत्रज्ञानानं आकर्षित केलं. १९९९ नंतर घरोघरी कॉम्प्यूटर आणि इंटरनेट पोहचलं होतं. कॉम्प्यूटर उत्पादक कंपन्यांनी सहजता दाखवत लहान मुलंही संगणक वापरू शकतील अशा प्रणालींना विकसीत केलं होतं. मोठ्या संख्येत तरुण इकडं आकर्षित होत होते. त्यापैकीच एक होता जोनाथन जेम्स.

जेम्स फक्त १५ वर्षाचा होता तेव्हा त्यानं कॉम्प्यूटरच्या दुनियेनं त्याला आकर्षित केलं होतं. त्याची बुद्धी संगणकापेक्षा तल्लख होती, असं ही बोललं जातं. त्यामुळंच हळू हळू होत कॉम्प्यूटरच्या हॅकिंगकडं वळाला. जेम्सनं काही कालावधीनंतर हॅकिंग व्यवस्थित शिकून घेतली. नंतर त्यानं प्रयोगाला सुरुवात केली. त्यानं ‘कॉम्रेड’ (Comrade) या नावानं हॅकिंगच्या दुनियेत पाउल ठेवलं. हॅकिंगसाठी प्रोग्रॅम बनवायला सुरुवात केली. ज्या वयात मुलांसाठी कॉम्प्यूटरचा उपयोग फक्त गेमिंगसाठी होता त्या वयात जोनाथन पट्टीचा हॅकर बनला होता. हॅकिंगच बऱ्यापैकी ज्ञान त्यानं मिळवलं. त्याला लहान सहान हॅकिंग करण्यात काही रस राहीला नव्हता. त्याला काही मोठं खुणावत होतं. तेव्हा त्याची नजर पडली अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘नासा’वर.

आणि नासाचे कॉम्प्यूटर हॅक झाले

नासाची सिस्टम हॅक करण्यासाठी त्यानं प्रोग्रॅम बनवायला सुरुवात केली. त्यानं यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. थोड्याच कालावधीत त्यानं प्रोग्रॅम बनवला देखील. शाळेतल्या आणि दुकानातल्या कॉम्प्यूटरमध्ये तो प्रोग्रॅम त्यानं तपासून घेतला. या प्रोग्रॅमच्या मदतीनं तो कोणत्याही फाईलमध्ये शिरुन हवी ती माहिती काढू शकत होता. त्यानं नासाच्या सॉफ्टवेअर फक्त हॅक केले नाही तर ते चोरले सुद्धा. त्या सॉफ्टवेअरची किंमत त्यावेळी १२ लाख डॉलर होती. नासाच्या सॉफ्टवेअरमधून बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी शक्य होत्या.

त्यानं आंतराष्ट्रीय आवकाश स्थानकं म्हणजे स्पेस स्टेशनचे सोर्स कोडही मिळवले होते. सोर्स कोडशी केलेली छेडछाड नासासाठी नुकसाणीस कारणीभूत ठरली. यामुळं त्यांना ४१ हजार डॉलर्सचं नुकसान झालं. यामुळं नासाच्या इतर फाइलीतला बराच डेटा चोरीला गेला. हॅकिंग प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनलं होतं. अमेरिकेनं साऱ्या तापास यंत्रणा हॅकरला शोधण्याच्या कामात गुंतवल्या. जोनाथनला खात्री होती की त्याच्यापर्यंत कुणीच पोहचू शकत नाही.

तुरुंगात झाली रवानगी

नासा आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला भीती होती की जो हॅकर नासापर्यंत पोहचू शकतो त्याचे हात आणखीन आत जाऊ शकतात. देशाच्या सुरक्षेवर याचा परिणाम होऊ शकतो. प्रकरणाचं गांभीर्य त्यांना कळालं होतं. तपास यंत्रणांनी शोध सुरु केला आणि जोनाथनचं पत्ता त्यांनी मिळवलाच. पुढच्या दिवशी पोलीस जोनाथनच्या घरी पोहचली. जोनाथनची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तो अमेरिकेचा पहिला नाबालिक होता ज्याला हॅकिंगसाठी शिक्षा झाली. त्यानं माफी मागितली पण हे प्रकरण इथच संपणारं नव्हतं. त्याचं आयुष्य कलाटणी घेणार होतं.

खोट्या आरोपांनी घेतला बळी

सहा महिन्यांची शिक्षा संपवल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्याकडे लोक अपराधी म्हणून पाहू लागले. गुप्तहेर विभागाची सतत नजर त्याच्यावर असायची. त्यानं परत हॅकिंगकडे वळू नये म्हणून ते नजर ठेऊन होते. काही वर्षानंतर अमेरिकेत पुन्हा मोठ्या स्तरावर हॅकिंग झालं. संशयाची सुई जोनाथनकडं वळाली. त्याच्या घरावर छापा मारण्यात आला. जोनाथमसाठी ही छापेमारी अनपेक्षित होती. जेम्स घाबरला होता.

या छापेमारीनंतर त्याच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. तो नेहमी घाबरलेला असायचा. त्याच्या घरावर झालेल्या छापेमारीच्या बातम्या पेपरात झळकत होत्या. हे प्रकरण झालं आणि नंतर दोन आठवड्यानंतर पुन्हा जोनाथनची बातमी आली. त्यानं आत्महत्या केली होती. पाच पानी सुसाइट नोट त्यानं लिहली होती. जोनाथनचा न्यायालायवर आणि कायद्यांवर विश्वास राहिला नव्हता. त्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल दोषी मानलं गेल्याचं त्यानं लिहलं. यामुळंच त्यान आत्महत्या केली. जगातल्या सर्वात मोठ्या हॅकरचा असा दुर्दैवी अंत झाला.

ही बातमी पण वाचा : जगात आता अणुबाँब नाहीतर जैवीक हत्त्यारांची दहशत वाढतीये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button