मुंबईत पार पडणार नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

Warkari Sahitya Parishad

मुंबई :- वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडणार आहे. दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२० दरम्यान पार पडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत, आणि माजी राज्यपाल  डी. वाय. पाटील हे उपस्थित असणार आहेत.

दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडेल. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष  नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  रामदास आठवले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.  माजी मंत्री  दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील. २१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरुवात होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प.  अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प.  चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्वीकारतील.

स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधी दरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदूषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार व्यक्त करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER