कोरोना, राज्यात दिवसभरात ९,९०५ रुग्ण झालेत बरे

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाच्या (Corona) ९,९०५ रुग्णांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८९.२ आहे.

आज राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण आढळलेत. राज्यात रुग्णांची एकूण संख्या १६,४८,६६५ झाली आहे. गेल्या २४ तासात ८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ४३,३४८ झाली आहे. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER