लांजा तालुक्यात ९७१ चाकरमानी दाखल

Migrant Workers

रत्नागिरी(प्रतिनिधी) : मुंबई- पुण्यामध्ये वाढणारा कोरोना प्रसार पाहुन लांजा तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असून आजतागायत लांजा तालुक्यात 971 चाकरमानी दाखल झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लांजा कुवे नगरपंचायत विविध उपाययोजना करत आहे. नागरी कृतीदलाच्या माध्यमातून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत लांजा शहरात ९७१ नागरिक मुंबई-पुणे आदी विविध भागातून आले आहेत. या सर्व नागरिकांचे नॉन कॉन्टॅक्ट डिजिटल थर्मामीटरद्वारे स्क्रिनिंग करण्यात आले. हा तपासणी उपक्रम राबविण्यासाठी नगराध्यक्ष मनोहर बाईत, मुख्याधिकारी तुषार बाबर, नागरी कृती दल अध्यक्ष, सर्व नगरसेवक व कर्मचारी मेहनत घेत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER