९७ ! शेकरूंच्या संख्येत एक वर्षात दीडपट वाढ

Maharashtra Today

अहमदनगर : शेकरूला राज्य महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा दर्जा आहे. हा देखणा प्राणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. मात्र, यावर्षी मात्र शेकरूंची (Shekru Khar)संख्या गेल्यावर्षापेक्षा दीडपट वाढली, ही दिलासादायक बाब आहे.

महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. तो झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य आहे.

यावर्षीच्या गणनेत हरिश्चंद्रगड अभयारण्यात ९७ शेकरू आढळलेत. शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ झाली. या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची ३९६ घरटी आढळली आहेत मात्र, त्यांची संख्या ९७ असून कोथळे ४३, विहीर २०, लव्हाळी १७, पाचनई १४, कुमशेतमध्ये ३ शेकरू आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवी घरटी बनवतात. यामुळे शेकरूंची गणना मे मध्ये करण्यात येते. हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. अंतिम आकडा जूनमध्ये मिळेल, असे वन विभागाने म्हटले आहे. ही गणना ‘जीपीएस’ने केली जाते. यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू शकणार असून इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळ यांनी सांगितले.

शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. ते १५ ते २० फुटची लांब उडी मारू शकते. फळे आणि फुलांतील मध हे त्याचे खाद्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button