कोल्हापूर आणि पुण्यात खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती साजरी

Kolhapur & Pune

पुणे : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना दुसरा खाशााब जाधव पुरस्काराने गौरवित करण्यात आले. कोल्हापुरातीला भवानी मंडप येथे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 15 जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पुण्यातील हनुमान कुस्ती आखाडाच्या सभागृहात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 96 वी जयंतीचा विशेष समारंभ साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

देशाचे पहिले ऑलिम्पिदक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींला उजाळा दिला. प्रतिकुल परिस्थितीवर मात खाशाबांनी जिंकलेले पदकाची कथा त्यांनी उपस्थित कुस्तीगीरांना सांगितली. खाशाबांचे पदक हे आजही महाराष्ट्राचे एकमेव ऑलिम्पिक पदक असल्याची खंत व्यक्त करून संजय दुधाणे पुढे म्हणाले की, देशासाठी खेळताना खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पदक आजही प्रेरणादायी आहे. त्यांची जयंती शासनाच्या क्रीडा खात्याने, कुस्ती परिषदेने साजरी केली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER