विष्णूचा दहावा अवतार सांगणा-या अब्जाधिश क्लार्ककडील छाप्यात 93 कोटीची रोख जप्त

Cash

बेंगळुरु : सुरुवातीला लाईफ इन्शुरन्सचा क्लार्क म्हणून काम करणा-या आणि आता स्वत:ला भगवान विष्णूचा 10 वा अवतार सांगणा-या एका कथित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर आयकर विभागाने छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम तब्बल 93 कोटी रुपयांची आहे. तर याशिवाय दुस-या आश्रमांवर मारलेल्या छाप्यात 409 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचेही समोर आले आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडुसह 40 ठिकाणी छापा मारण्यात आला. आयकर विभागानं एकाच वेळी चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू या ठिकाणी छापा मारला. कल्कीने त्यांच्या समूहाची स्थापना 1980 मध्ये केली होती. त्यानंतर त्याचा विस्तार झाला. यामध्ये रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि क्रीडा क्षेत्राचा समावेश आहे. या समूहाने परदेशातही पाय पसरले आहेत.

ही बातमी पण वाचा : नाना पाटोलेंच्या गुंडांची परिणय फुकेच्या भावाला मारहाण, गंभीर जखमी

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. आश्रमाला लोकांकडून मिळालेल्या डोनेशनची माहिती लपवण्यात आली. आश्रम आणि समुहातील स्टाफ अकाउंट बुकशिवाय रोख रक्कमही ठेवत असत. याशिवाय प्रॉपर्टी चढ्या भावाने विकून पैसे कमवत होते. ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात होती. ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. याच्या जोरावर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुत मोठ्या प्रमाणावर जमीनीची खरेदी केली गेली होती.

छाप्यात 25 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेज जवळपास 18 कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले आहे. याशिवाय 88 किलो सोनेही सापडले आहे. याची किंमत 26 कोटी रुपये इतकी होते. तसेच 5 कोटी रुपयांचे हिरे आयकर विभागाला सापडले आहेत. या तपासात संपूर्ण ग्रुपच्या 500 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.

विजयकुमार हे आधी लाइफ इन्श्युरन्स कार्पोरेशनमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांनी 1980 मध्ये एक इन्स्टिट्यूट उघडली. जीवाश्रम नावाने शाळा सुरू केल्यानंतर चित्तूर इथे एक विद्यापीठही उघडले. 1990 पर्यंत त्यांनी स्वत:ला विष्णूचा दहावा अवतार कल्की असेही घोषित केले. त्यानंतर प्रसिद्धी मिळत गेली. अनेक मान्यवर व्यक्ती आणि सिने जगतातील व्यक्ती त्यांचे शिष्य, अनुयायी झाले. त्यांनी ट्रस्टमध्ये पत्नी पद्मावती आणि मुलगा एनकेव्ही कृष्णा यांना भागिदार केले.