सचिन वाझेच्या हदयात ९० टक्के ब्लॉकेजेस; वकिलांची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- उद्योगपती अंबानी स्फोटकेप्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझेच्या (Sachin Vaze) प्रकृतीबाबत चिंतादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत (90% blockages in Sachin Waze’s heart) निष्पन्न झाले आहे. वकील आबाद पोंडा यांनी विशेष न्यायालयात सचिन वाझेला वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे.

आज सचिन वाझेच्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे वाझेला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाने वाझेचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये बरेच ब्लॉकेज आढळले आहेत. वाझेवर वेळीच उपचार न केल्यास त्याच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. आता एनआयए कोर्ट काय निर्देश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात वाझेची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे वाझेला जे.जे.  रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर रात्री १.३० च्या सुमारास  परत आणले. यापूर्वीही चौकशी दरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझेची प्रकृती बिघडली होती. तेव्हादेखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला  रुग्णालयात नेले. वाझेच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा त्याला मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते.

वाझेचा १३ तास तपास

अँटिलिया स्फोटकेप्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेसोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे पथक गुरुवारी रात्रीपासून १३ तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली होती. एनआयएने ताब्यात घेतलेली महिला १६ फेब्रुवारीला सचिन वाझेसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसली असल्याचा संशय आहे. संबंधित महिला ही वाझेची निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button