सांगली शहरात नवे 9 तर ग्रामीण भागात 4 कोरोना बाधित

Corona Patient

सांगली :- सांगली महापालिका क्षेत्रात शनिवारी आणखी नऊ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 असे एकूण 13 कोरोनाबाधित सापडले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले पण मिरजेत उपचारासाठी दाखल असलेल्या चार आणि कर्नाटकातील दोन अशा सहा जणांची कोरोना चाचणी पॉजीटिव्ह आली आहे. तर जयसिंगपूर येथील 74 वर्षीय कोरोनाबधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे.

सांगली महापालिकाक्षेत्रात शनिवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये हनुमाननगरमधील 3, विठ्ठलनगर, वारणाली, कर्नाळरोडवरील दत्तनगर, मिरजेतील ब्राम्हणपुरी, इस्त्रायलनगर आदी ठिकाणी प्रत्येकी एक अशा तेराजणांचा समावेश आहे. ग्रामीण जिल्ह्यात पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 42 वर्षाच्या महिलेला आणि 24 वर्षाच्या तरुणीला, तासगाव तालुक्यातील बोरगावातील 51 वर्षाचा पुरुष, आटपाडी तालुक्यातील कानकातरेवाडी 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागन झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 472 वर गेली असून यापैकी 262 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. बारा जणांचा मृत्यू झाला असून सध्या 198 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER