एनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद

9-al-qaeda-terrorists-arrested-by-nia-in-west-bengal-kerala

नवी दिल्ली:  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल (WB) आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला (Al-Qaeda Terrorist) मोठा धक्का बसला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एनआयएने  अल कायदाच्या नऊ  संशयित दहशतवाद्यांना (9 Terrorist) अटक केली आहे. आज एनआयएच्या टीमने अनेक ठिकाणी छापे मारत कारवाई केली. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये ही कारवाई केली.

एनआयएनं म्हटलं आहे की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्व जणांना सोशल मीडियावरून पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून  कट्टरपंथी बनवलं होतं. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केलं जात होतं. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली  जाऊ शकते. ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारं आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे.

देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्रं  आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूलबाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER