कोरोना उच्चांक गाठतोय : देशात ६० लाख रुग्ण !

88,600 New COVID-19 Cases T

नवी दिल्ली :- रविवारी २७ सप्टेंबर रोजी भारतात ८८,६०० नवीन कोरोना रुग्णांची (New Corona Case) संख्या नोंदवली गेली आहे. तर मृतांची संख्या १,१२४ ने वाढून आतापर्यंत ९४,५०३ एवढी झाली आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशात ९,५६,४०२ कोरोना रुग्ण आहेत. तर ४९,४१,६२८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात शनिवारी २०,४१९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४३० मृत्यू नोंदवले गेले आहेत. मृतांचा आकडा आता ३५,१९१ वर गेला आहे.

आंध्रप्रदेशात (AP) ७२९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ मृत्यू . राज्यात एकूण रुग्णसंख्या ६,६८,७५१ एवढी झाली आहे तर मृतांचा आकडा ५,६६३ वर गेला आहे.

जागतिक स्तरावर आतापर्यंत ३२.५ दशलक्षापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा आकडा ९,८९,००० पेक्षा जास्त आहे.

भारतात जवळपास ६० लाख कोरोना रुग्ण
रविवारी, २७ सप्टेंबर रोजी भारतामध्ये ८८,६०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद केली. मृतांची संख्या १,१२४ ने वाढून ९४,५०३ झाली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ९,५६,४०२ कोरोना रुग्ण आहेत, तर ४९,४१,६२८ रुग्णांना बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोनामुळे मृत्यू वाढले; अंत्यविधीसाठी पहावी लागते तासंतास वाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER