सांगलीतील आतापर्यंत 88 कोरोना बाधित

Sangli - Coronavirus

सांगली : जिल्ह्यात आज तीन जण कोरोना बाधित झाले असून उपचार खालील रुग्णांची संख्या 39 झाली आहे. मंगळवार अखेर 47 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्हात आजपर्यंत 88 जण ठरले आहेत . यामधील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.

सांगली जिल्ह्यात मंगळवारी कोरोना बाधित झालेल्यांमध्ये तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथे मुंबईहून आलेला 32 वर्षीय पुरुष , आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दि. २४ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे 41 वर्षीय वडील आणि बनपुरीमधीलच 24 मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची दहा वर्षीय बहीण आदींचा समावेश आहे.

सांगोला तालुक्यातील किडेबिसरी येथील 48 वर्षाच्या कोरोना बधिताने आपले गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे हे आपले गाव असल्याची चुकीची माहिती दिलेली होती. मंगळवारी त्याच्या प्रकृतीत सुधारणा असून त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे . शिराळा तालुक्यातील मोहरे येथील पन्नास वर्षाचा पुरुष आणि खिरवडे येथील 56 वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत ऑक्सिजनवर आहेत.धारावी ते मालगाव येथे बसने आलेल्यां मधील 75 वर्षीय महिला अतिदक्षता विभागात विशेष उपचाराखाली होती. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यातआले आहे. 25 मे रोजी कोरोना मुक्त झालेला बलवडी येथील 55 वर्षाचा पुरुष अतिदक्षता विभागात होता. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER