सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 85ब्लॅक स्पॉट

Black Spot

सातारा : सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरच सुमारे 85ब्लॅक स्पॉटची ठिकाणे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वात जास्त ब्लॅक स्पॉट कराड, सातारा, खंडाळा, वाई व फलटण तालुक्यात आहेत. सातारा जिल्ह्यातून 129.25 कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. तर राज्य प्रमुख मार्ग 93 हजार 470 कि.मी. लांबीचा तर 2 हजार 119.290 कि.मी. लांबीचा जिल्हा रस्ता असून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे.

इतर जिल्हा मार्ग 2 हजार 302.380 कि.मी., ग्रामीण मार्ग 7 हजार 110.140 कि.मी. लांबीचा असून तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर विभाग अंतर्गत येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे 84 ब्लॅक स्पॉट ठरवण्यात आले आहेत. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांकडून सर्वेक्षण करुन ही ठिकाणे ठरवण्यात आली आहेत.

राज्यातील रस्ते अपघातांचे व अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशामध्ये रस्ते अपघात व अपघाती मृत्यूमध्ये राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. 2018 च्या तुलनेत 2019 च्या अपघात सांख्यिकीचा अभ्यास केला असता 2019 च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीच्या तुलनेत राज्यस्तरावर एकूण रस्ते अपघातसंख्येत – 4.0 टक्के इतकी घट झाली आहे. अपघाती मृत्यू संख्येमध्ये -3.6 टक्के इतकी घट झाली आहे. एकूण जखमीच्या संख्येत -6.3 टक्क्यांनी घट झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER