भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३८ लाख ५० हजारांपेक्षा जास्त

Coronavirus Cases India

दिल्ली : गुरुवार, ३ सप्टेंबरला भारतात कोरोनाच्या (Corona) नव्या ८३,८८३ रुग्णांची नोंद झाली. एक दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचा हा विक्रमी आकडा आहे. आता भारतात (India) कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३८,५३,४०७ झाला आहे, अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांत १,०४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ६७,३७६ झाला आहे. सध्या देशात ८,१५,५३८ सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण असून २९,७०,४९२ रुग्ण बरे झाले आहेत.

४.५५ कोटी चाचण्या
२ सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या ४,५५,०९,३८० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या ११,७२,१७९ चाचण्या बुधवार (२ सप्टेंबर ) रोजी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने  (Indian Council of Medical Research)  दिली. कोरोनाचा प्रसार ज्या भागात जास्त आहे तिथे चाचण्या मोठ्या संख्येत घेतल्या जात आहेत. यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांवर वेळीच उपचार सुरू करता येतील. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER