८०० अल्पसंख्याकांनी केला शिवसेनेत प्रवेश

800 minorities joined Shiv Sena

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुमारे एक वर्ष आहे. विविध जाती – धर्माचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे (Shivsena) नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ८०० पेक्षा जास्त अल्पसंख्याकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.

गोरेगाव पश्चिम, संस्कार धाम विद्यालयाच्या पटांगणात “समस्यांवर समाधान” या कार्यक्रमात सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाचे समाजसेवक हनीफ मलबारि ऊर्फ अन्नु मलबारी यांनी हजारो मुस्लिमांसोबत शिवसेनेत प्रवेश केला.

सुभाष देसाई यांनी सांगितले की, शिवसेना जातपात मानत नाही. प्रामाणिक, निष्ठेने सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला भेदभाव न करता संधी देते. अल्पसंख्याक समाजाच्या काही समस्या शिवसेनाप्रमुखांनी चुटकीसरशी कशा सोडविल्या या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER