शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण; उभारले १२५ खाटांचे कोविड सेंटर, मोफत उपचारही

Maharashtra Today

उस्मानाबाद : राज्यात विशेषतः मराठवाड्यात कोरोना (Corona) रूग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढत आहे. संसर्गाचा वाढता आलेख आणि मृतांची संख्या लक्षात घेता कोरोना सेंटर व रुग्णालयांची गरज पाहता शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरात १२५ बेडचे कोविड सेंटर सुरू (125 bed covid center) केले आहे. राज्य, केंद्र सरकार आपल्यापरीने कोरोनाशी लढा देत आहे, मात्र सामाजिक बांधिलकी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही शिकवण यातून प्रेरणा घेत हा प्रयत्न केला असल्याचे राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्याप्रमाणेच आता उस्मानाबादमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यातुलनेत आरोग्य सुविधा, बेड, औषधी यांची कमतरता पाहता लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू केली आहेत. उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रमकाश राजेनिंबाळकर (Ompramkash Rajenimbalkar) यांनी देखील पवनराजे काँम्प्लेक्स येथील समर्थ मंगल कार्यालयात १२५ बेडचे अद्यावत कोविड सेंटर  सुरू केले.

शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन व इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने हे जम्बो कोवीड सेंटर आजपासुन रुग्णांच्या सेवेसाठी सूरु करण्यात आले आहे. शिवसेनेने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले आहे. ८० टक्के समाजकारणाचे सुत्र मानुन कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. येथील उपचारासाठी आयएमएच्या तज्ञ डॉक्टराचे सहकार्य लाभले असुन रुग्णांना येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केले आहे. कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासत असल्याने सव्वाशे बेड पैकी पन्नास बेडला ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दुर करण्यासाठी हे कोवीड सेंटर अधिक उपयोगाची ठरणार आहे. येथे येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती ओमराजे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button