८० डॉक्टर , परिचारिकांचा जम्बो कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास नकार

Corona virus center pune

पुणे : कोरोनावर (Corona virus) नियंत्रण मिळविण्यासाठी उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील (Covid-19 center) त्रुटी आणि सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर ४० डॉक्टर आणि ४० परिचारिकांसह वैद्यकीय कर्मचार्‍यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास नकार दिला आहे . रुग्णालयाचे कामकाज सांभाळत असलेल्या लाइफलाईनचे संचालक सुजित पाटकर (Sujit Patkar) यांनी यासंदर्भात माहिती दिली .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) हस्ते उद्घाटन झालेल्या जम्बो रुग्णालयामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच बिकट झाल्याचे पाहायला मिळते आहे. रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने आठवडाभरात ३० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे .

डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी असा दावा केला आहे की, रुग्णाच्या नातेवाइकांकडून आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जम्बो कोविड सेंटरचे दरवाजे फोडणे, शिवीगाळ करणे आणि धमकावणे अशा घटना घडत आहेत.

डॉक्टरांवर दबाव आणला जात आहे . त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशी माहितीही पाटकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER