दिल्लीत एका रुग्णालयात डॉक्टरांसह ८० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!

दिल्ली : येथील सरोज रुग्णालयामधील (Saroj Hospital) डॉक्टरांसह ८० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यानंतरही येथे कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णांवरील उपचार सुरु ठेवण्यात आले आहेत. २७ वर्षांपासून या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा संसर्गाच्या या लाटेत मध्ये करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. करोना झालेल्या १२ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर कर्मचारी आणि डॉक्टरांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पी. के. भारद्वाज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर ए. के. रावत यांचे शनिवारी निधन झाल्याची माहिती दिली. रावत यांना करोना झाला होता, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, असे भारद्वाज म्हणाले. डॉक्टर रावत यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले होते. तरी त्यांना करोना झाला. मागील महिन्याभरामध्ये रुग्णालयातील ८० कर्मचाऱ्यांना करोना झाला होता, असे भारद्वाज म्हणालेत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, दिल्लीमधील एकूण ३०० डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. सरोज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्याप्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आले आहेत. दिल्लीमधील गुरु तेज बहादूर रुग्णालयातील एका तरुण डॉक्टरांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button