महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीच्या पत्त्यावर आठ कंपन्यांची नोंद ! चौकशी करा; किरीट सोमय्या यांची मागणी

kirit somaiya & kishori pednekar

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचे चिरंजीव साईप्रसाद यांची कंपनी किश कार्पोरेट सर्व्हिस इंडिया प्रा. लि. आणि इतर आठ कंपन्यांचा पत्ता एकच आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

सोमय्या यांनी याबाबत राज्याचे अतिरिक्त सचिव (उद्योग) भूषण गगराणी यांना पत्र लिहून ‘किश’ची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोमय्या यांनी आठवण करून दिली आहे की, महापालिकेची कामे मिळणारी किश ही कंपनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराची आहे, असे काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी म्हटले होते. महापौरांनीही मान्य केले होते की, ही कंपनी त्यांच्या मुलाची आहे.

सोमय्या यानी म्हटले आहे की, किशोरी यांचा मुलगा साईप्रसाद हा या कंपनीचा संचालक आहे. किशोरी या पण कंपनीच्या संचालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीच्याच पत्त्यावर आणखी दुसऱ्या आठ कंपन्या नोंदल्या गेल्या आहेत. याची चौकशी करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER