१२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान

79 Percent Voting From 12 Thousand 711 Gram Panchayats

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान म्हणाले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections,) पूर्णतः तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात २२ जानेवारी २०२१ रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होईल.

आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी एकूण ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर २ लाख ४१ हजार ५९८ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: २ लाख १४ हजार ८८० उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ होती, असेही मदान यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय टक्केवारी (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- १४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक- ५६५, धुळे- १८२, जळगाव- ६८७, नंदुरबार- ६४, अहमनगर- ७०५, पुणे ६४९, सोलापूर- ५९३, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलडाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०४, भंडारा- १४५, गोंदिया- १८१ आणि गडचिरोली- १७०. एकूण- १२७११.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER