कोल्हापूर : स्वच्छता मोहिमेचा ७५ वा आठवडा

कोल्हापूर - स्वच्छता मोहिमेचा ७५ वा आठवडा

कोल्हापूर : स्वच्छतेच्या अमृत महोत्सवी आज स्वच्छता अभियानाची सुरवात दसरा चौक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जयंती नाला पंपीगस्टेशन येथे वक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर (Nilofar Azarekar), जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai), महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (Mallinath Kalshetti) उपस्थित होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने (Kolhapur Municipal Corporation) गेले 75 आठवडे संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान सातत्यपूर्ण सुरु आहे. महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी विशेषत: आरोग्य कर्मचारी आणी स्वयंसेवी – सेवाभावी संस्था, तालीम व तरुण मंडळे आणि नागरिकांच्या उत्स्‍फुत सहभागाने गेली 75 आठवडे शहरात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्य संपन्न बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाने निकराचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे महापालिकेचे स्वच्छता अभियान कोल्हापूरवासीयांनी ख-या अर्थाने लोकचळवळ बनविली आहे. या अभियानातून शहरातील नद्या, नाले, गटारी, रस्ते, चौक, उद्याने, चौपाटी, घाट आणि फुटपाथ स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहेत.

स्वच्छतेच्या 75 व्या आठवडयानिमित्त आज संपुर्ण शहरात स्वच्छतेचा जागर झाला. प्रत्येकजण आपापल्या परीने शक्य तेथे स्वच्छतेचे काम करत होते. चौका चौकात नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सर्व शाळातील शिक्षक आणि विद्यार्थीयांनी शाळा आणि शाळांचा परिसर स्वच्छ केला, सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचा परिसर स्वच्छ केला. बाग कर्मचाऱ्यांनी बागांचा परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवी – सेवाभावी संस्था, तालीम व तरुण मंडळे आणि नागरिकांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच घाटांची स्वच्छता केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER