बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी ७५ हजार; योगी सरकारची घोषणा!

Yogi Adityanath-Workers

लखनऊ :- यूपीमधील योगी सरकारने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना दिलासा दिला आहे. यूपी सरकारने कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी ७५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळेल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव सुरेश चंद्र (Suresh Chandra) यांनी दिला आहे.

यूपीतील कामगार व श्रम विभाग बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी ‘कन्या विवाह सहायता योजना’ राबवते. या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. योजनेच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली असून दोन हजारांहून अधिक जोडप्यांनी लग्नासाठी नाव नोंदणी केली आहे.

या योजनेत ज्यांची कामगार विभागात १०० दिवसांहून आधी नोंदणी झालेली आहे. ते १२ मार्चपर्यंत जिल्ह्यातील कामगार कार्यालयात अर्ज करू शकतात. लखनऊ, हरदोई, सीतापूर, रायबरेली, उन्नाव, लखिमपूर खीरी, बाराबंकी यासारख्या जिल्ह्यांतून प्रतिसाद मिळत आहे. योगी सरकारचे १८ मार्चपर्यंत ३ हजार ५०० जोडप्यांचा विवाह करण्याचे उद्दीष्ट आहे. हा कार्यक्रम रायबरेली रोडवरील वृंदावन योजनेत आयोजित केला जाईल. या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित राहू शकतात.

मनसेचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला

पालघरातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ८०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. २६ फेब्रुवारीला हा सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र नियोजन केले. जोडप्यांना साडी, भांडी, बाशिंग यांचे वाटप केले. परंतु राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत सोहळा पुढे ढकलण्याचे आदेश दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER