राज्यातील 75 हजार शिक्षकांची 25 वर्षापासून फरफट

Maharashtra Teachers

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील सुमारे 75 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तुटपुंज्या म्हणजे केवळ 20 टक्के पगारावर काम करीत आहेत. गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांची ही फरफट सुरू आहे.

राज्यातील साडेसहा हजार विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचा अनुदान मिळण्यासाठी लढा सुरू होता. अनेक आंदोलन केल्यानंतर 2016 मध्ये या शाळा अनुदानित करण्यात आल्या. पहिल्या वर्षी 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा करून पुढील प्रत्येक वर्षी 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला. मात्र पुढील अनुदान मिळालेच नाही.

वारंवार आंदोलन व विनंती केल्यानंतर सरकारने 13 सप्टेंबर 2019 ला अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र निधी वितरणाचे आदेशच काढले नाहीत. शासनाच्या अनुदान धोरणानुसार या सर्व शाळा 100 टक्के अनुदानास पात्र आहेत. मात्र यापूर्वीच्या सरकारने 19 सप्टेंबर 2016 ला पुढील आदेश येइपर्यंत सरसकट 20 टक्के अनुदान, असा निर्णय घेतला. शिक्षकांनी 17 जूनला मंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन केल्यानंतर याची दखल महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली. शिक्षणमंत्री, अर्थमंत्री व संबंधित सर्व अधिकारी यांची 22 जूनला मिटींग घेऊन हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER