सांगली जिल्ह्यात बुधवारी 75 कोरोनारुग्ण

Sangli Coronavirus

सांगली : महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामिण भागाला कोरोनाचा(Corona Virus) विळखा घट्टच होत चालला असून बुधवारी तब्बल 75 रुग्ण सापडले. केवळ सांगली शहरात 69 कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी तब्बल 52 रुग्ण एकट्या महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रातील आहेत. शहरासाठी हा मोठा धक्का असून उत्तर शिवाजीनगरचा संपुर्ण परिसर संवेदनशील घोषित करण्यातआला आहे.

मिरजेतील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या औरवाड (ता.शिरोळ, कोल्हापूर) येथील 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला . सांगलीसाठी बुधवरचा दिवस हादरा देणारा ठरला. दुपारी दोनच्या सुमारास निवारा केंद्राचा आकडा सोशल मिडियावरून व्हायरल झाला आणि शहरावर आज चिंतेचे ढग अधिकच गडद झाले.महापालिकेच्यावतीने बेघर निराधारांसाठी इन्साफ फौंडेशनच्या माध्यमातून उत्तर शिवाजीनगरातील आपटा पोलिस चौकीजवळील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत सावली बेघर निवारा केंद्र चालवले जाते. चार दिवसापुर्वी तेथे एक रुग्ण निष्पन्न झाला होता. त्यानंतर संपर्कातील सर्वांच्या तपासण्यांचे धक्कादायक निष्कर्ष मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER