पोस्टातून मिळणार तब्बल ७३ सेवा

नवी दिल्ली : बहुतांश वित्तीय सेवा देणाऱ्या टपाल विभागात (post office) आता सार्वजनिक सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सामान्य नागरिकांसाठी असलेल्या ७३ सेवांचा लाभ मिळणार आहे. या केंद्रातर्फे शेतकऱ्यांना सर्व सुविधांसह पंतप्रधान पीक विमा योजनांचाही (PM crop insurance schemes) लाभ घेता येणार आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. योजनेसाठी कसा अर्ज करावा, कुठून करावा या समस्या राहणार नाहीत. कारण, टपाल विभागाने एक योजना आणली आहे. या योजनेमुळे टपाल कार्यालयात सार्वजनिक सेवा केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रातर्फे पंतप्रधान यांच्या योजनांशी संबंधित सर्व योजनांची नोंदणी टपाल कार्यालयात सुरू करण्यात येईल.

प्रधानमंत्री जनधन खाते उघडायचे असेल किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची नोंदणी अशा सर्व योजनांची नोंदणी येथे केली जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभाबरोबरच आवास योजनेची नोंदणीही केली जाणार आहे. या केंद्रात आधार कार्ड बनवता येणार आहे. यासह आधार कार्डचे अपडेट केले जाणार आहे. मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिकेत मिळत असते. परंतु, आता टपाल केंद्रात हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER