राज्यात ७२ हजार कोंबड्या नष्ट

72000 hens destroyed

नागपूर :- ‘बर्ड फ्लू’चा (Bird flu) संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात ७२ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ज्या भागात ‘बर्ड फ्लू’चे नमुने सकारात्मक आहेत, त्या भागातील १० किलोमीटर परिसरात दोन ते तीन महिने पाहणी करून नमुने घेतले जात आहेत. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा संसर्ग आढळला नाही, तर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केले जाणार आहे.

कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित परिसरापासून एक किलोमीटरचा परिसर नियंत्रित क्षेत्र घोषित करणार, त्या भागातील कोंबड्या व इतर पक्षी नष्ट केले जाणार आहे. ही माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. नष्ट केलेल्या कोंबड्यांसाठी शासनाकडून मदत दिली जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी बुटीबोरीजवळील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना  बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही नमुना सकारात्मक आला नाही. जिल्ह्यातील साथ आता पूर्णपणे आटोक्यात असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. काणे यांनी सांगितले. माहितीनुसार, ८ जानेवारीपासून आतापर्यंत २० हजार १९८ विविध पक्ष्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झाला. दोन आठवड्यांपासून यात घट झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER