
नागपूर : शुक्रवारी नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असेल्या केंद्रप्रमुख, मुख्यध्यापक, शिक्षक यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता नीधीला मदत म्हणून दिले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात तथा राज्यात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती भारती पाटील आणि शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या पुढाकाराने हा निधी जमा करण्यात आला. एकूण ७२ लाख २० हजार रुपयांचा निधी जि.प. अध्यक्ष, रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती बोढारे आणि शिक्षण समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धनादेशाच्या स्वरूपात सोपवण्यात आला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला