अंबाबाईला ७१ लाखाचे दागिने अर्पण

Ambai bai

कोल्हापूर : करवीनिवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा या देवस्थानवर भाविकांची अमाप श्रद्धा आहे. या दोन्ही देवस्थानच्या येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून देवदेवतांना सोने-चांदीचे दागिने अर्पण होतात. या दोन्ही मंदिराला गेल्या आर्थिक वर्षात अर्पण झालेल्या सोने व चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत करवीरनिवासिनी अंबाबाईला सोने व चांदीचे मिळून एकूण ७१ लाख ६९ हजार ६७४ रुपये किंमतीचे दागिने अर्पण झाले आहेत. जोतिबा मंदिराला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने व चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत १२ लाख पाच हजार ४२७ रुपये इतकी आहे. दोन्ही मंदिराला मिळून वर्षभरात ८३ लाख ७६ हजार ९९ रुपयांच्या किंमतीचे दागिने अर्पण झाले आहेत.

अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक हजार ९०९ ग्रम सोने अर्पण झाले आहे. सोन्याच्या दागिन्याची किंमत ६४ लाख ४९ हजार ६१६ रुपये इतकी आहे. तर सात लाख २० हजार ५५ रुपयांच्या किंमतीचे १८ हजार २२९ ग्रॅम चांदी भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहे. जोतिबा मंदिराला गेल्या आर्थिक वर्षात २७६ ग्रॅम किंमतीचे ९ लाख वीस हजार ६४५ रुपये किंमतीचे सोने तर दोन लाख ८५ हजार ७८२ रुपये किंमतीचे चांदीचे अर्पण केले आहे. चांदीचे वजन ७७५२ ग्रॅम इतके आहे.

दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम मुंबई येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पुरुषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. समितीच्या खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, राजाराम गरुड यांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया झाली. मंदिरातील गरुड मंडप येथे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली.

दख्खनचा राजा जोतिबाला अर्पण दागिने

गेल्या आर्थिक वर्षात दख्खनचा राजा जोतिबा मंदिराला नऊ लाख वीस हजार सोन्याचे दागिने भाविकांनी अर्पण केले आहेत. हे सोन्याचे दागिने २६७ ग्रॅम वजनाचे आहेत. जोतिबा मंदिराला सात हजार ७५२ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण केले असून त्याची किंमत दोन लाख ८५ हजार ७८२ रुपये इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER