बार फोडून ७० हजारांची दारु चोरीला

बियर बार फोड

औरंगाबाद : बियर बारच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी ७० हजार ३६० रुपयांची महागडी दारु लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्हन हिल्स, अपना बाजार येथील हॉटेल कॅस्टल एक्झीक्युटिव्ह बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. यानंतर मागील दरवाजाची काच फोडून आत शिरलेल्या चोरांनी विविध कंपनीची महागडी दारु आणि सीसी टिव्हीचा डिव्हीआर असा ७० हजार ३६० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना २७ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश चंद्रभान तेलोरे (३२, रा. संभाजी कॉलनी, सिडको) यांच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक गायके करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER