भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच, भुजबळांच्या दाव्याने खळबळ

BJP- NCP

नाशिक : भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत, शरद पवार (Sharad pawar) याबद्दल निर्णय घेतील असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. अजित पवार (Ajit Pawar)आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं त्यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. प्रत्येक पक्षाची आपली ध्येयंधोरणं असतात. ती ध्येयंधोरणं मुख्यमंत्र्यांना सांगितली जातात. अनेकदा शरद पवार हेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सूचना करतात. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी मागासवर्गीय घटकांबद्दल सूचना केल्या तर त्यावर नाराजीचं कारण नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपच्या गोटात असलेले आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, पवारांची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER