
कोलकाता : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हट्टी, गर्विष्ट आणि अहंकारी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘शेतकरी सन्मान योजना’ लागू केली नाही त्यामुळे पश्चिम बंगालमधील सुमारे ७० लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेत, असा आरोप भाजपाचे (BJP) अ. भा. अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P Nadda) यांनी केला. ते नालंदा येथे भाजपाच्या ‘परिवर्तन रथयात्रे’च्या सभेत बोलत होते.
नड्डा यांचे ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी स्वागत करण्यात आले. ममता बॅनर्जी जय श्रीरामाच्या घोषणांमुळे चिडतात, म्हणून नड्डा यांनी ममताना टोमणा मारताना प्रश्न केला, त्या जय श्रीरामाच्या घोषणेमुळे का चिडतात?
बंगालचे जनमत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आहे, असा दावा करताना ते म्हणालेत की, विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित आहे.
कोर्टाकडून स्थगिती नाही – विजयवर्गीय
जेपी नड्डा यांच्या या परिवर्तन रथयात्रेला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाला ही यात्रा रोखण्याचा अधिकार प्राप्त नाही. ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या रथयात्रेत ११ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कूचबिहार येथे सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार कैलाश विजयवर्गीय यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला