एसबीआय बँकेला 70 कोटिंचा गंडा

मुंबईतील ख़ासगी कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा, सीबीआयची कारवाई

sbi

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाला ७० कोटिंचा चुना लावल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने मुंबईतील लाइव्हवेल एयर टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक, सीईओ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या गुंह्यात कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मानेक दावेर, मुख्य कार्यकारी अभियंता बी दावेर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

सीबीआयच्या आरोपानुसार, २०१५ ते २०१७ दरम्यान कंपनी आणि त्यांच्या संचालकांनी संगमनताने फसवणुकीचा कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, बनावट आर्थिक अहवाल बँकेला सादर सादर केला. या आधारेच कंपनीने बँकेला 61 कोटिंची पत सुविधा वाढविन्यास उदयुक्त केले. बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेची सुमारे ७० कोटिंची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहेत.