दिव्यात लेप्टोचे 7 बळी

leptospirosis

ठाणे /प्रतिनिधी: दिव्यात मागील दोन दिवसापुर्वी एका 18 वर्षिय तरुणीचा लेप्टोस्पारसिसने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच, अणखी सहाजणांचा याच आजाराने मृत्यु झाला असून यामध्ये चार पुरुषांसह दोन महिलांचा सामावेश आहे. मागील तीन दिवसात सात जणांचे लेप्टोस्पायरसिसने बळी गेल्याने दिव्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठाणे जिल्ह्यातील जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र अहाकार उडाला आहे. त्यात बारवी, भातसा धरणांतील पाणी सोडल्यामुळे उल्हास व काळू नद्या दुधडी भरून वाहू लागल्याने सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यात ठाणे महानगर पालिका हद्दीतील दिवा भागात देखिल हजारो घरांमध्ये पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर दिव्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे दुर्गंधीने दिवावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याने पूरग्रस्त हैराण झाले असून संशयित लेप्टोचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यात शुक्रवारी साबेगावातील मंजिरी सगट या 18 वर्षीय तरुणीचा मृत्यु झल्यानंतर, दिव्यात एकच खळबळ उडाली. त्यात अणखी चार पुरुषांसह दोन महिलांचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दातिवली येथील श्लोकनगर फेस-2 येथे राहणारे 43 वर्षीय संतोष शिंदे यांच्यासह मुंब्रा कॉलनीत दीपक कांबळे (35) असे तिसर्या मृत्यू पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. या तीन मृत्यूनंतर आणखी एका वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच दिव्यात भीतीचे वातावरण पसरले. त्यात अनुशा दळवी, मोहीनी आंम्रे या दोन महिलांसह अणखी दोन पुरुषांचा देखिल मृत्यु झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे सहाही रुग्ण संशयित लेप्टोचे रुग्ण होते.

दरम्यान, दिव्यात पुर ओसरल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्यावतीने लागलीच यंत्रणा राबवून साफसाफाई करणे अनिवार्य होते. मात्र, माहपालिकेने ती केली नाही, तसेच निष्काळजीपणामुळे दिव्यात साथीचे आजार बळावत असल्याचा आरोप भाजपाचे दिवा मंडल अध्यक्ष अ‍ॅड.आदेश भगत यांनी केला आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या त्या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी सुरु आहे. आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात आले असून पालिका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची भेट घेतल्या आहेत. – डॉ. हरिदास गुजर, मुख्यवैद्यकीय अधिकारी, ठामपा.