कोरोना अपडेट: रत्नागिरी जिल्ह्यात 7 अहवाल पॉझिटिव्ह; एकूण संख्या 132

Ratnagiri Corona Positive

रत्नागिरी/प्रतिनिधी :- मिरज येथून रत्नागिरी जिल्ह्यातील 455 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 448 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात गुहागर 2, दापोली 2, रत्नागिरी 2 आणि संगमेश्वर 1 असे रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 132 झाली आहे. काही वेळापूर्वी प्रशासनाने दिलेल्या 2 रुग्णांची माहिती गैरसमजापोटी मिळाली असून हे रुग्ण गुरुवारी रात्री मिळालेल्या 11 रुग्णांपैकी आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 91 असून उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण 37 आहेत व आजपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER