देशात आतापर्यंत ७ टक्के जास्त पाऊस

rain

नवी दिल्ली : यावर्षी संपूर्ण देशात आतापर्यंत ७ टक्के जास्त पाऊस पडला. अजून काही दिवस कुठे ना कुठे पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला.

सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे त्याचा पिकांना फायदा होणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चांगली मदत मिळणार आहे. मात्र, या पावसाचा नेमका किती फायदा अर्थव्यवस्थेला होईल, याविषयी नेमकी आकडेवारी सध्या तरी देता येणार नाही, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन म्हणाले.

देशात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बहुतेक भागात पाऊस विश्रांती घेईल. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. मात्र वायव्य आणि मध्य भारतामध्ये १७ सप्टेंबरपासून पावसाची पुन्हा सुरुवात होण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज डॉ. एम. राजीवन आणि हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. एम महापात्रा यांनी आभासी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

अतिवृष्टीचा अंदाज वर्तवताना हवामानशास्त्र विभाग ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अचूक असल्याचे सिद्ध झाले. ‘अम्फान’ चक्रीवादळाचा अचूक अंदाज खूप आधीच वर्तविल्यामुळे जीवितहानी तसेच मालमत्तेची हानी होण्यापासून वाचण्यास मदत झाली. तथापि पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीला येवून धडकणाऱ्या चक्रिवादळाचा प्रकार वेगळा असल्याने त्यांचा मागोवा घेवून त्याविषयी अंदाज घेणे अतिशय अवघड असते, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER