टॉप्स ग्रुपकडून कंत्राटासाठी एमआरडीएला ७ कोटींची लाच, ईडीच्या चौकशीत उघड

Pratap Sarnaik - ED

मुंबई : टॉप्स ग्रुपकडूनएम एमआरडीएला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्याबाबतचा तपास करत आहेत.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचं लक्षात आल्यानंतर ईडीनं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना अटक करून २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली. चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून, त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदोळे यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्याने हा सरनाईक यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. अमित चांदोळे यांनी ईडीच्या चौकशीमध्ये रोख रक्कम स्वीकारली असल्याचे मान्य केले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तपास आणि साक्षीमधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले होते.

अमित चांदोळे हे प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. टॉप सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांना कंत्राट मिळवून देण्यात अमित चांदोळेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यात अमित चांदोळेंना लाचेच्या स्वरूपात काही रक्कमही मिळत असल्याचा गौप्यस्फोट ईडीच्या चौकशीतून उघड झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये एमआरडीएकडून जवळपास ३५० ते ५०० गार्डचं कंत्राट मिळालं होतं.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे.३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास १५०च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER