राज्यात ६९० लाख टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे :  गळीत हंगामाचा आता उत्तरार्थ सुरू झाला असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात १६४ लाख टन तर राज्यात ६९० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात सुमारे ३५० लाख टन तर कोल्हापूर विभागात अजून सुमारे ७५ लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. दरम्यान साखर उताऱ्यात कोल्हापूर-सांगली अव्वल असून ११.६४ टक्के उतारा मिळाला आहे. राज्याचा सरासरी उतारा १०.०५ टक्के इतका आहे.

या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १८३ कारखान्यांच्या  गळीत हंगामास सुरुवात झाली. १५ नोव्हेंबरनंतर पूर्ण क्षमतेने गाळप सुरू झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात ९५० लाख टन तर कोल्हापूर विभागात सुमारे २५० लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. ६८९.२८ लाख टन उसाचे गाळप होऊन ६९२.९८लाख क्विंटल साखरचे उत्पादन झाले आहे. मागील महिन्यात राज्याचा सरासरी साखर उतारा ९.७० टक्के होता.  तो आता १०.०५ टक्के झाला आहे. कोल्हापूर-सांगलीच्या साखर उताऱ्यात मागील महिन्याच्या तुलनेत ०.४८ टक्के वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER