राज्यात ६७,१६० नव्या रुग्णांची नोंद; ६७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सध्या आरोग्यव्यवस्थेवरही ताण पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांनी कोरोनाची (Corona) साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र असे असले तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज ६३ हजार ८१८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०२ टक्के झाले आहे. राज्यात आज ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.५१ टक्के आहे.

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,९४,४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३४,६८,६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३,९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button