धक्कादायक : राज्यात २४ तासांत आणखी ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Police Corona Virus

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले. या कठीण काळात जीवाची पर्वा न करता जनतेला सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसांनादेखील कोरोनाचा संसर्ग अधिकच होत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत राज्यात आणखी ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सद्य:स्थितीस १ हजार ९७ पोलिसांवर कोरोनाचा उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५९ वर पोहचली आहे. दरम्यान देशभरात २४ तासांत कोरोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER