लाखोंच्या मोबाईलसह दोघांना विमानतळावर अटक

iphone-mumbai-airport

मुंबई : शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने 67 नवेकोरे आयफोन आणि 57 जुने फोन घेऊन भारतात आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

दक्षिण आफ्रिकेहून मोहम्मद युनुसमिया हा भारतीय नागरिक इथियोपियन एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ET610 ने मुंबईत आला. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या तपासणीत ही बाब समोर आली. दरम्यान मोहम्मदसह त्याला विमानतळावर घेण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. हे सर्व फोन प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्याने मोठ्या बॅगेत लपवले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व फोनची किंमत 43 लाख 18 हजार रुपये इतकी आहे.