मुंबईच्या ६६ टक्के महिला मोदींवर नाराज; पण पुन्हा संधी देणार !

लोकसभा निवडणूक २०१९

66 percent of Mumbai women are angry with Modi

मुंबई : कोणाला मत देणार ? यासाठी एका वृत्तपत्राने मुंबईत महिलांचा कल घेतला तर सुमारे ६६ टक्के महिलांनी मोदींच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली पण; मोदींना पुन्हा संधी (मत) देणार आसल्याचे सांगितले!

गृहिणी आणि साधारणपणे ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नोकरी करणाऱ्या महिलांनी मोदी यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. २० पैकी १३ महिलांनी त्यांना मत देणार नाही, असे म्हटले आहे.

मात्र, नोकरदार तरुणी आणि उच्चशिक्षित महिलांनी मोदी यांना पाठिंबा दिला आहे. या दोन्ही गटांतील २० पैकी सरासरी १८ महिलांनी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी युतीला मतदान करू, असे सांगितले. मोदींनी पाच वर्षांत अपेक्षित काम केले नाही, पण त्यांना पुन्हा संधी मिळायला हवी, असे मत या वर्गातील महिलांनी व्यक्त केले आहे.

मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या महिलांनी म्हटले आहे की – मोदी धाडसी निर्णय घेऊ शकतात. पाच वर्षे हा काम करण्यासाठी कमी वेळ आहे, त्यामुळे आणखी एक संधी द्यायला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोदी यांच्या काम करण्यावर मर्यादा आल्या. मोदींचे परराष्ट्र धोरण यशस्वी आहे; चीन, पाकिस्तान, नेपाळ वगळता इतर देश भारताच्या बाजूने उभे राहिले.

मोदी यांना विरोध करणाऱ्या महिलांचे मत आहे की – नोटबंदीमुळे रोजगार बुडाले. बाजारात मालाला उठाव नाही. महागाई वाढल्यामुळे घर चालवताना नाकीनऊ आले. रोजगार निर्मिती आणि उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नाही.