शेतात पडला ६० फूट खोल खड्डा; आकार रोज वाढतो आहे !

Maharashtra Today

जमीन खचून गड्डे होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात पण मेक्सिको (Mexico) येथे एका शेतात पडलेला खड्डा इतका मोठा झाला आहे की त्यामुळे प्रशासनही काळजीत पडले आहे. हा खड्डा पुएब्ला सांता मारिया झॅकटेपेक (Santa Maria Zacktepek) परिसरात एका शेतात पडला आहे.

याबाबत न्यूयार्क पोस्टने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, सुरुवातील हा खड्डा फक्त १५ फूट व्यासाचा होता. हळुहळू त्याचा आकार वाढत गेला, सध्या त्याच्या व्यास ३०० फूट (300ft-sinkhole) आहे. प्रशासनानेही याची दखल घेतली आहे व नागरिकांना त्यापासून दूर राहण्याची सूचना केली आहे.

मेक्सिको स्टेट सिविल इंजीनियर्स या खड्ड्यावर लक्ष ठेवून आहे. हा खड्डा आता ६० फूट खोल झाला आहे आणि त्यात पाणी भरते आहे. शेतात राहणाऱ्या परिवाराला सरकारने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

शेतात राहणाऱ्या कुटुंबाने सांगितले की, या भागात वीज पडण्यासारखा मोठा आवाज ऐकू येत होता. आमच्या शेतात काय झाले आहे हे प्रशासनाने आम्हाला सांगितले नाही. आम्ही अतिशय काळजीत आहोत कारण अनेक अडचणींचा सामना करून आम्ही हे घर बांधले आहे आणि आता ते या खड्ड्याच्या अगदी काठावर आले आहे.

या भागाचे गव्हर्नर मिगुएल बार्बोसा हुयर्टा म्हणालेत की, या घटनेवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. या खड्ड्यामुळे जीवित हानी होऊ नये याची दक्षता घेत आहोत. हा खड्डा भौगोलिक कारणामुळे निर्माण झाला आहे. लवकरच यावर उपाय सापडेल.

पर्यावरण सचिव बिट्रियाझ मॅन्रिक म्हणालेत की, या भागातील माती मऊ असल्याने जमिनीतील पाण्यामुळे मातीचा पट्टा खचला असावा, किंवा या भागातील मातीचे लागून असलेले पट्टे कमी-जास्त मऊ असल्याने, मऊ पट्टा खचला असावा.

नेमके काय झाले आहे, हे अजून कुणालाही कळले नाही. त्यामुळे, लोक चमत्कार म्हणून याकडे पाहत आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button