राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या कार्यालयात कोरोनाचे थैमान ; सहा अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal.jpg

मुंबई :- राज्यात कोरोनाने (Corona Virus) थैमान घातले आहे.  राजकीय नेत्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत अनेक राजकारण्यांना  त्याची लागण झाली आहे. आता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयातच सहा अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER