
रत्नागिरी/प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 30 झाली आहे. या रुग्णांमध्ये सावंतवाडी तालुक्याच्या बांदा गावचा एक पुरुष रुग्ण, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचा एक पुरुष रुग्ण, कुडाळ तालुक्यातील कवठी गावची एक महिला, कणकवली तालुक्यातील बावशी गावची माहिला रुग्ण व देवगड तालुक्यातील वाडा गावची 1 महिला आणि कालवी गावची 1 महिला यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला