गॅस सिलिंडर स्फोटाच्या नुकसानभरपाईसाठी आहे ६ लाखांचा विमा, इतर खर्चासाठी …

Maharashtra Today

मुंबई : गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून विमा व जखमींच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळते.

भारतात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) या तीन कंपनी गॅस सिलिंडरच्या स्फोटासाठी सुरक्षा विमा(6 lakh insurance for gas cylinder explosion,) देतात. या इंशुरन्स पॉलिसीचं नाव ‘पब्लिक लायबिलिटी इंशुरन्स (Public Liability Insurance) आहे. Public Liability Insurance अपघातासाठी ५० लाखांपर्यत, व्यक्तीसाठी १० लाखांपर्यंत आणि एक वर्षात १०० कोटी रुपयांपर्यंत असतो.

विम्यात मिळणारे फायदे

हिंदुस्ताना पेट्रोलियमने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यात पर्सनल एक्सिडंट कव्हर ६ लाख रुपयांपर्यंत मिळतो. मात्र, वैद्यकीय खर्चासाठी ३० लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे. प्रति व्यक्ती ही मर्यादा २ लाख रुपये आहे. तात्काळ मदतीच्या रुपात २५ हजार रुपये मिळतात. संपत्तीच्या नुकसान भरपाईत प्रति अपघात २ लाख रुपये मिळतात. हा लाभ केवळ नोंदणीकृत ग्राहकांना नोंदणी केलेल्या पत्त्यासाठी मिळतो. म्हणूनच ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन घेतलंय ते ठिकाण बदलले तर गॅस कंपनीकडील पत्त्यातही वेळीच बदल करुन घ्या. नोंदणीचा पत्ता आणि अपघात झाला तो पत्ता वेगळा असेल तर कोणताही लाभ मिळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button