जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांचे ६ कोटीचे नुकसान

Farmer

कोल्हापूर : जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी, महापूर, परतीचा पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ६ कोटी ९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ६३९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात २३८२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले ६३९१ हेक्टर क्षेत्र आहे. प्रतिहेक्टर ६८०० रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांना ६ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, भाजीपाला उत्पादक ९१ शेतकऱ्यांचे २६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून ६३९१ हेक्टरवरील पिकांचे ६ कोटी ९ लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे.

यंदा मान्सून वेळेत सुरू झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली. त्यानंतर खरीप पिकांना पोषक असाच पाऊस झाल्याने वाढ जोमात झाली. मात्र, यावर्षी तीनवेळा महापूर आला, आठ दिवस अतिवृष्टी झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. ढगफुटीने शिवारे तुटून गेली. त्यानंतर पिके काढणीस आल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने हाता-तोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER