कोल्हापुरातून ५९ हजार लोक रवाना

Daulat Desai - Migrant Workers

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील ४३ हजार ४७८तर महाराष्ट्रातील १५ हजार ५८० असे ५९ हजार ५८ लोक बुधवारीअखेर त्यांच्या-त्यांच्या गावांना रवाना झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

यामध्ये परराज्यातील सुमारे ४३हजार४७८ स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तरप्रदेशमधील १६ हजार ७५०, बिहारमधील ११ हजार ५०४, मध्यप्रदेशमधील दोन हजार ६५०, झारखंडमधील दोन हजार १३८, छत्तीसगडमधील २७५, राजस्थानमधील तीन हजार ६२०, गुजरातमधील ३०२, गोवामधील ४९०, कर्नाटकमधील तीन हजार ३९८, आंध्रप्रदेशमधील ९४, तेलंगनामधील १७८, केरळमधील ७४, तामिळनाडूमधील ३६९, ओरीसामधील ९५५, पश्चिम बंगालमधील २७७, दिल्लीमधील ४०, पूर्वेकडील राज्य १९३, आणि इतर १७१ असे ४३ हजार ४७८ जण रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील रवाना झालेल्यामध्ये मुंबई शहर ११०, मुंबई उपनगर १६, ठाणेमधील ६०५, पालघर ११८, रायगड १६७, रत्नागिरी ६४४, सिंधुदुर्ग ५९३, सातारा ७०६, सांगली १८५२, सोलापूर२३४५, पुण्या २३७३, नाशिक २८८, धुळे २६४, जळगाव १६४, नंदुरबार १६८, अहमदनगर११३८, औरंगाबाद १०८, बीड ३३९, जालना ८८, उस्मानाबाद ७७५, लातुर १०३०, नांदेड २७२, परभणी ४३५, हिंगोली ८२, आमरावती ३६, अकोला९१, बुलढाणा ७९, यवतमाळ १६०, वाशिम १०४, नागपूर ५७, भंडारा ३६, वर्धा ४६, गडचिरोली ३७, चंद्रपूर९० आणि गोंदिया१४४ असे एकूण १५ हजार ५८० जण रवाना झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER