अनुसूचित जातीच्या विद्याध्य्यांसाठी ५९ हजार कोटींची शिष्यवृत्ती केंद्राची योजना

नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी (Scheduled Caste Students) ५९ हजार कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे. देशभरातील ४ कोटी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती सामाजिक कार्यमंत्री थावरचंद गेहलोत (Thavarchand Gehlot) यांनी काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ही बातमी पण वाचा:- टपाल विभागांतर्गत ४ हजार २६९ ग्रामीण डाक सेवकांसाठी भरती

शिष्यवृत्ती योजनेतील ६० टक्के पैसा (३५ हजार ५३४ कोटी) केंद्र सरकार देणार असून, उर्वरित ४० टक्के वाटा राज्य सरकारांनी उचलावयाचा आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना राबविली जाणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सुमारे १.३६ कोटी मुले गरिबीमुळे दहावीनंतर पुढे शिकू शकत नाहीत. अशा मुलांना पुढील शिक्षणाचा आधार देण्यासाठी ही योजना उपयोगी ठरणार असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. याअंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षाला १,१०० कोटी रुपये दिले जातात. मात्र, नव्या योजनेमुळे केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजनेसाठीची तरतूद पाचपटीने वाढेल, अशी माहितीही गेहलोत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER