PM CARES फंडातून जिल्हा रुग्णालयांत उभारणार ५५१ ऑक्सिजन प्लांट; मोदी सरकारचा निर्णय

Narendra Modi

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात देशात ऑक्सिजनचा मोठा प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनअभावी बऱ्याच रुग्णांना जीवही गमवावा लागला. तसेच अनेक राज्यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आता केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी PM CARES फंड अंतर्गत जिल्हा रुग्णालयांमध्ये आता ५५१ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.

PM CARES फंड अंतर्गत देशात ५५१ मेडिकल ऑक्सिजन उभारण्यास पंतप्रधान मोदींनी मंजुरी दिली आहे. हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिनज वाढवण्यासाठी मोदींच्या आदेशानुसार PM केअर्स फंड अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी ५५१ ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ऑक्सिजन प्लांट हे विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये उभारले जातील. या ऑक्सिजन प्लांटची खरेदी आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येईल. देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या उद्देशाने हे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत, असे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. कोरोना संकटाच्या या काळात PM CARES फंड अंतर्गत देशातील विविध जिल्हा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ५५१ ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याचा निर्णयाबद्दल आभार, असे अमित शहांनी ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button